कोल्हापूर : करवीर क्षेत्रातील सर्वात जुन्या सार्वजनिक वाचनालयापैकी एक म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचे श्री.भास्करराव जाधववाचनालय हे होय. अनेक वर्षापासून करवीरवासीयांसाठी एक सांस्कृतीक केंद्र म्हणून उदयास आलेले हे वाचनालय. सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचा वारसा जतन करणाऱ्या या संस्थेचा इतिहासही तितकाच जूना आहे.
सन 1941 ते 1949 या स्वातंत्र्यपूर्व काळात करवीर नगर परिषदेने श्री.भास्करराव जाधव वाचनालय, छ.महाराणी ताराबाई वाचनालय व पद्माराजे वाचनालय अशी तीन वाचनालये सुरू केली होती. करवीर संस्थानाचे विलीनीकरणानंतर सन 1952 मध्ये तत्कालीन नगरपरिषदेने इतर दोन वाचनालये भास्करराव जाधव वाचनालयामध्ये समाविष्ट करून सुसज्ज असे वाचनालय सुरू केले. श्री भास्करराव जाधव हे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. त्यांनी कोल्हापूर शहरासाठी जे योगदान दिले त्याचे स्मरण म्हणून या वाचनालयाला ‘¸ÉÒ भास्करराव जाधव ´ÉÉSÉxÉɱɪɒ असे नामकरण करणेत आले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे श्री.भास्करराव जाधव वाचनालय दरवर्षी सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम म्हणून राजर्षि शाहू व्याख्यानमालाआयोजित करते. वाचनालयाच्या स्थापनेपासून समाज प्रबोधनासाठी वेळोवेळी अनेक तज्ज्ञ लोकांची व्याख्याने आयोजित केली जात होती. मात्र सन 1985 पासून प्रत्येक वर्षी महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सदर व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील थोर व नामवंत वक्त्यांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित केली जातात.
यावर्षी सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 ते शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.00 वाजता पाच व्याख्यात्यांची व्याख्याने गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब खसबाग येथे आयोजित करणेत आली आहेत. व्याख्यात्यांची नांवे व विषय पुढील प्रमाणे आहेत.
अ.नं. | दिनांक | वक्त्याचे नांव | विषय |
1 | 16/12/2024 | केशव जाधव (मुंबई) अवर सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई | महाभारत काल आज आणि उद्या |
2 | 17/12/2024 | प्रविण दवणे (ठाणे)
जेष्ठ साहित्यिक |
दीपस्तंभ :मनातले, जनातले |
3 | 18/12/2024 | उर्मिला शुभंकर (कोल्हापूर)
समुपदेशक शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर |
चला तणावमुक्त जगूया ! |
4 | 19/12/2024 | संजय आवटे (पुणे)
संपादक,लोकमत पुणे |
चला उभारु नवी पिढी ! |
5 | 20/12/2024 | तृप्ती धोडमिसे (आय.ए.एस.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली. |
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि संवाद. |
आज अखेर राजर्षि शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेत सिंधूताई सपकाळ, द.मा.मिरासदार, तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ.यु.म.पठाण, विश्वास पाटील, शिवाजीराव भोसले, डॉ.कुमार सप्तर्षी, शेषराव मोरे, नरेंद्र दाभोळकर, हरी नरके, डॉ.गंगाधर पानतावणे, बाबासाहेब पुरंदरे, आ.ह.साळुंखे, डॉ.आनंद यादव, प्रा.यशवंत पाटणे, फ.मु.शिंदे, जयसिंगराव पवार, ज्ञानेश महाराव, श्याम येडेकर, विष्णू सूर्या वाघ, अच्युत गोडबोले, मंगेश पाडगांवकर, मीना प्रभू, गिरीश कुबेर, सदाशिव अमरापूरकर, अरविंद इनामदार, जयंत नारळीकर, निळू दामले,प्रवीण दवणे, शिरीष कणेकर, तात्याराव रहाणे, पोपटराव पवार, इंद्रजित देशमुख,प्रदीप निफाडकर,लक्ष्मीकांत देशमुख,प्राचार्य श्याम भुर्के, डॉ.अमर आडके, प्राचार्य अनिल बोधे,डॉ.राजन गवस, चंद्रकांत निंबाळकर, मधूसूदन सूर्वे, डॉ.रमेश जाधव, महेश झगडे अशा अनेक दिग्गज वक्त्यांची व्याख्याने यापूर्वी भास्करराव जाधव वाचनालयाच्यावतीने आयोजित करणेत आलेली आहेत.