अमल महाडिकांनी महानगरपालिकेच्या अभियंताशी भेट घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अमृत योजनेअंतर्गत रखडलेली कामे, रस्ते, पाणीपुरवठा पाईपलाईन, भटकी कुत्री, कचरा उठावाची समस्या अशा विविध प्रश्नांसंदर्भात महानगरपालिकेच्या शहर अभियंता, जल अभियंता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत आमदार अमल महाडिक यांनी बैठक घेतली. येत्या 100 दिवसात प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचनात्यांना केल्या.

 

 

शहरातील अखंडित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत योजनेतून उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनची कामे गतीने पूर्णत्वाला न्यावीत. त्यासाठी आवश्यक निधी आणि इतर कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असा विश्वास यावेळी दिला.