महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त खाद्य महोत्सव 2024 चे आयोजन

कोल्हापूर : 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्य दर वर्षी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही शुक्रवार दि.13 ते रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत ताराबाई पार्क, सासणे ग्राऊंड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

या खाद्य महोस्तवात 100 स्टॉलचे नियोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. खाद्य पदार्थ बरोबरच महिला बचत गटानी बनवलेल्या विविध वस्तूंचीही विक्री व  प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगरपालिकांमधील नावीन्य पूर्ण उत्पादने असणारे महिला बचत गट यामध्ये सहभागी होणार आहेत.

            या महोत्सवात खाद्य पदार्थामध्ये वडा कोंबडा, तांबडा पांढरा रस्सा, बिर्याणी, पूरण पोळी, खांडोळी, रक्ती मुंडी, मटणाचे लोणचे, झुणका भाकरी, भरीत भाकरी, पाणीपुरी, स्प्रिंग पोट्याटो, चिकन शोरमा, आंबोळी, दावणगिरी डोसा, पावभाजी, BBQ, मोमोज, सँडविच, कोंकणी पदार्थ, सर्व प्रकारचे पापड, लोणचे अशा विविध पदार्थांचा आस्वात सर्वांना घेता येणार आहे.  त्याचबरोबर बचत गटानी बनवलेले कोल्हापुरी चप्पल, मातीच्या वस्तु, बांबूच्या वस्तु, हस्तकला वस्तु, रोपवाटिका, हँडमेड ज्वेलरी, नॅपकिन बुके, बांगड्या, ज्वेलरी, चिमणी घरटे उत्पादक, बांगड्या, ज्वेलरी, पर्स, बॅग अशा विविध वस्तु विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तरी सर्व कोल्हापूर वासीयानी या महोत्सवास भेट देऊन या महोत्सवातील विविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.