कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर कार दुचाकी अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी गंभीर जखमी झाला आहे. परसू भीमराव बनसोडे (वय 45, रा. कोथळी, ता.शिरोळ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (दि.10)रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
या अपघातात सतीश मल्लू वायदंडे (रा. कोथळी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.