मुंबई: ईव्हीएम मशीन बाबत विरोधकांनी केलेले सगळे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत .ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते ईव्हीएम मशीनवरून आरोप प्रत्यारोप करत आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे . निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघांनीय विभागातून पाच मतदान केंद्राची निवड करण्यात येते. त्यानुसार या पाच मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅटची मोजणी करणे अनिवार्य असते.
याला अनुसरून राज्यभरातील सर्व विधानसभा मतदान केंद्रांमध्ये मोजणी झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ही मोजणी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर झाली असून, उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या सह्या आहेत. त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या माध्यमातून निवडणूक आयोगाने महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.