मुंबई: दिल्लीमध्ये पराभूत उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची ही शक्यता याबाबत बैठकीत चर्चा झाली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप वारपे, खडकवासल्याचे सचिन दोडके, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट ,पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे रमेश बागवे हे या बैठकीला उपस्थित होते. मतदार यादीतील घोळ, वाढलेली मतं ईव्हीएम बाबत पराभूत उमेदवार ,शरद पवार आणि सिंघवी यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली.
ईव्हीएम संदर्भात शरद पवार यांच्या निवासस्थानी आज रात्री ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनू संघवी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. ही बैठक आज रात्री आठ वाजता होण्याची शक्यता आहे.