MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे गट-ब (पोलीस उपनिरीक्षक पदाबाबत) व गट-क यांची जाहिरातीची नियोजित तारीख/वर्ष बदलणेबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब (पोलीस उपनिरीक्षक पदाबाबत) व गट-क ची जाहिरात १० महिने उशिरा आल्याने हजारो विद्यार्थ्यांचे वय पात्रतेमध्ये बसत नाही. याचे नेमकं कारण अस की, आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार ही जाहिरात जानेवारी २०२४ मध्ये येणे गरजेची होती, परंतु ही जाहिरात ऑक्टोंबर महिन्यामध्ये आल्याने याचा खूप मोठा फटका विद्यार्थ्यांना बसलेला आहे. त्यामुळे ही वय मर्यादेची तारीख १ फेब्रुवारी २०२४ ऐवजी १ फेब्रुवारी २०२५ अशी ग्राहय धरली आहे. यामुळे २०२४ मध्ये पात्र होणारे सर्व विद्यार्थी अपात्र होत आहेत.

या अनुषंगाने आज MPSC मुलांच्या शिष्टमंडळसहित सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि वरील विषयानुसार आयोगाने वय मर्यादेची तारीख १ फेब्रुवारी २०२४ ग्राहय धरुन लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, म्हणून विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत सचिवांना याबाबत निर्देश दिले.

🤙 9921334545