सिद्धार्थ हौ.सोसायटीत बोअरचे लोकार्पण 

इचलकरंजी: प्रभाग क्र.१२ मधील सिध्दार्य हौसिंग सोसायटीतील बोअरचा लोकार्पण सोहळा मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्याहस्ते पार पडला. गेल्या अनेक महिण्यांपासून या भागात पाण्याची तिव्र टंचाई भासत होती.

 

 

त्यासंदर्भातील तत्कारी या भागातल्या नागरीकांनी रवी रजपूते यांच्याकडे केल्या. त्यानंतर रवी रजपूते यांनी स्वखर्चाने विदयुत बोअर खुदाई करून त्या बोअरचे आज लोकार्पण केले.

याबाबत रवी रजपूते म्हणाले, सिध्दार्य हौसिंग सोसायटीतील अनेक नागरी विकासाची कामे मी स्वतः मार्गी लावली आहेत. मी नगरसेवक असताना आणि नसतानाही आपल्या सेवेत आहे. यापुढेही आपल्या सेवेत राहणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रमोद बेलेकर, प्रदीप कांबळे, अमर कांबळे, सुधाकर कांबळे, महावीर कट्टी, किशोर कुरणे, आनंदा कांबळे, बबन कांबळे, मनोहर कांबळे, प्रवीण चव्हाण, सौ.सुवर्णा बेलेकर, सौ.सविता कांबळे, सौ.गीता काळे, सौ.निर्मला कांबळे, सौ.शोभा कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.