संजय राऊतांनी देवेंद्र फडणविसांना लगावला टोला

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. महापालिकेच्या आगामी निवडणुकीआधी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पाहिका निवडणुकीत जिथं जिघं शक्य असेल, तिथे- तिथे राज ठाकरेंना सोबत घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी काय करायचं हे फडणवीसच ठरवत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

 

संजय राऊत काय म्हणाले, राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं झालं आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यातून तर हे आता स्पष्ट झालेल आहे. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष जसं सांगेल तशी भूमिका घेत आहेत. लोकसभेत, विधानसभेच्या निवडणुकीत आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी काय करायचं हे देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत, अशा शब्दात संजय गास्तांनी देवेंट प्रतीम आणि राजाकरेंना टोला लगावला आहे.