देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ….सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला !

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन केल आहे.

 

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरीक्षक आज मुंबईत आले. निर्मला सीतारामन आणि विजय रूपाने यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, तर उर्वरित भाजपच्या आमदारांनी त्यांच्या नावावर अनुमोदन दिलं. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.