जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी सलग तिसऱ्यांदा बाबासाहेब चौगुले यांची निवड

कुंभोज (विनोद शिंगे )
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील माजी सरपंच व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन व आवाडे गटाचे कट्टर समर्थक बाबासाहेब चौगुले यांची सलग तिसऱ्यांदा जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक तसेच व्हाईस चेअरमन पदी आज निवड करण्यात आली.

 

 

हातकणंगले विधानसभा व इचलकरंजी विधानसभेच्या निवडणुकीत जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सलग तिसऱ्यांदा जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब चौगुले यांची आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली असल्याने त्यांच्या या निवडीमुळे कुंभोज परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी त्यांच्या निवडीची बातमी समजताच चौगुले यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालची उधळण करून आपला आनंद साजरा केला. चौगुले यांच्या निवडीनंतर त्यांच्या सत्कारासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. परिणामी कुंभोज गावच्या शिरपेच्यात पुन्हा एकदा जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मत सर्व सन्माननीय सभासद वर्गातून व्यक्त होत आहे.

🤙 9921334545