कोल्हापूर: राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर यांची आमदार पदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांनी धैर्यशील माने यांच्या घरी भेट देऊन आभार मानले.
आबिटकर यांच्या प्रचारार्थ राशिवडे तसेच गारगोटी या ठिकाणी धैर्यशील माने यांनी प्रचार सभा घेऊन नागरिकांना कामाचा माणूस म्हणून निवडून द्या , अशा पद्धतीचे आवाहन केले होते.
या मतदार संघात तिसऱ्यांदा निवडून येऊन आबिटकर यांनी विक्रम केला आहे. या प्रसंगी बोलताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार निवेदिता माने , विश्वविजय खानविलकर, झाकीर हुसेन भालदार, किरण पाटील, अतिग्रे गावचे सरपंच सुशांत वड्ड, जयवंत पाटील सर, बाबासाहेब कापसे आदी उपस्थित होते.