सोलापूर: जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील गावकऱ्यांनी ईव्हीएम वर आक्षेप घेत मंगळवार (दि.3 )रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी येथे आठ दिवसात 25 ते 50 हजार नागरिकासमवेत माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे.प्रशासनाने गावात कायदा सु- व्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून जमावबंदी ही लागू करण्यात आली आहे. तसेच मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
उत्तम जानकारी यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून ही प्रक्रिया रद्द करत असल्याचे जाहीर केले. पण यापुढे न्यायालयीन प्रक्रियेमधून आपण न्याय मागू असे सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी विजया पागरकर यांनी निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया घेऊ शकत नाही स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया राबवल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबवली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे