आम. अशोकराव मानेंचा श्री पार्श्वनाथ मंदिरात अतिशय क्षेत्र कमिटीच्या वतीने सत्कार

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून दलितमित्र डॉ अशोकराव माने यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल साजणी येथील श्री पार्श्वनाथ मंदिर येथे अतिशय क्षेत्र कमिटीच्या वतीने बापूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भगवान पार्श्वनाथांचे व गणधराचार्य कुंथुसागर जी महाराज, आचार्य गुणभद्र नंदी जी महाराज, कुंथुसागरजी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. आणि सर्वांचे अशोकराव माने यांनी मनापासून आभार मानले.

 

 

यावेळी सुरेश मोघे,सुहास राजमाने,आप्पासो पाटील, वैभव पाटील, अजिंक्य कोळी, सुरज कोळीझ अनमोल कदम यासह प्रमुख पदाधिकारी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.