कुंभोज (विनोद शिंगे)
वडगाव क्रीडा संकुलन यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्ष वडगाव शहरांमध्ये क्रीडा संकुल व्हावे यासाठी पाठपुरवठा सुरू आहे तसेच आंदोलने ही सुरू आहेत. या कृती समितीमध्ये आजूबाजूचे 30 खेडेगाव असून अद्यावत क्रीडा संकुल नसल्यामुळे अनेक क्रीडाप्रेमी वंचित राहिलेले आहेत.
यामुळे कृती समितीच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सहकार्याची भूमिका स्पष्ट केली. यासाठी उपस्थित पंचक्रोशीचे विजय अपराध, संदीप पाटील (बाबा), सागर कांबळे वठार सरपंच, सुरेश नरके, चांगदेव कांबळे, विकास नाईक कापूरवाडी सरपंच, प्रतीक शिंदे, रणजीत पाटील, उदय शिंदे तळसंदे माजी उपसरपंच, चंद्रकांत गुरव तासगाव सरपंच,सुरज तवटे, रोहन सूनगार, ओंकार माळी, प्रवीण सुतार, असे अनेक क्रीडा प्रेमी उपस्थित होते.