कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील उत्पादकांना हक्काची व खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘ओएनडीसी’ उपक्रमात थायलंड देशही आता सहभागी झाला आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस संबोधित केले.
सध्याच्या गतीमान युगात खरेदीसाठी आपल्याकडे वेळ नसल्याने ऑनलाईन खरेदीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये अनेक कंपन्या सक्रीय असून एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी केली तर त्या वस्तूच्या किमंतीतील ४५ टक्के हिस्सा ती संबधित कंपनी घेते. यामुळे उत्पादकाला फटका बसतोच, पण ग्राहकालाही त्याची झळ सोसावी लागते. महाराष्ट्रातील गूळ, केळी, कपडे, चप्पल, दागिने, काजूसह इतर शेती उत्पादनांचीही ऑनलाईन खरेदी-विक्री होते. यासाठी, केंद्र सरकारने ‘ओएनडीसी’च्या माध्यमातून उत्पादकांना हक्काची व खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे थायलंड सरकारही यामध्ये सहयोगी असून त्याची जबाबदारी चेतन नरके यांच्यावर दिली आहे.
यावेळी चेतन नरके म्हणाले, थायलंड, इंडोनिशियासह आशिया खंडात ‘ओएनडीसी’च्या माध्यमातून आपल्या देशातील उत्पादने ऑनलाईन विक्री करता येणार आहेत. सध्या इतर कंपन्यांसारखे ४५ टक्के हिस्सा न घेता केवळ ५ टक्के हिस्सावर उत्पादक व ग्राहकांना सेवा देणार आहे. त्याचा फायदा काेल्हापूर, महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी, छोटे-मोठे उद्योजकांना निश्चित होणार आहे. सामान्य उद्योजकाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवीन दालन खुले करुन देण्याचा माझा मानस आहे. यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या अर्थकारणाला गती मिळण्यास मदत होणार आहे.