मुंबई : राज्यात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदावरून गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रीपद यापैकी एक पर्याय देत विचार करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली आहे. दरम्यान, शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यामुळे कधीही सरकार बनवण्यासाठी अडचण येणार नाही. मी काहीही ताणून ठेवलं नाही, अमित शाह यांच्यासोबत देखील माझं बोलणं झालं. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. महायुती मजबूत आहे. मुख्यमंत्री बनवण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. शिवसेनेचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. आणखीन गतिमान निर्णय घ्यायचे आहे, असे शिंदे म्हणाले
महायुतीच्या सर्वांनी निवडणुकीत प्रंचड काम केल. मी पहाटेपर्यंत काम करायचो. पुन्हा माझी सभा असायची. हे सत्र पूर्ण निवडणुकीपर्यंत चाललं. ९०-१०० सभा घेतल्या. पायाला भिंगरी लावून मी साध्या कार्यकर्त्याप्रमाणे काम केल. मी स्वतःला एक मुख्यमंत्री कधीच समजलो नाही. एक सामान्य माणूस म्हणून मी काम केल. सर्वसामान्य जनतेसाठी आप काही तरी केल पाहिजे, असं शिंदे म्हणाले.