कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 452 मतदान केंद्रांवरील मतमोजणी दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा.पासून सुरू होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीर येथील मतमोजणी केंद्रांचा आढावा घेतल्यानंतर शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी तसेच हातकणंगले येथील मतमोजणी केंद्रावरील तयारीबाबत प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या.
मतमोजणी केंद्रावरील सुरक्षा, मतमोजणी प्रक्रिया राबवित असताना कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत याबाबत पोलीस प्रशासन तसेच निवडणूक प्रशासनाला योग्य ती काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी या भेटीत दिले. यावेळी त्या त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतमोजणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील 3 हजार 452 मतदान केंद्रावरील ईव्हीएमसाठीची मतमोजणी 144 टेबलच्या माध्यमातून एकुण 245 फेऱ्यांद्वारे पुर्ण होईल. यासाठी सर्व मतदारसंघ मिळून ईव्हीएमसाठी मतमोजणी पर्यवेक्षक 176, सहायक 186, सुक्ष्म निरिक्षक 196 असे एकुण 558 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत. तसेच पोस्टल मतमोजणीसाठी 126 टेबलच्या माध्यमातून मतमोजणी पर्यवेक्षक 154, सहायक 308, सुक्ष्म निरिक्षक 154 असे एकुण 616 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत. यामध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती पुढिलप्रमाणे –
चंदगड : मतमोजणी ठिकाण : पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 390 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 28 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 18 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 22, सहायक 44, सुक्ष्म निरिक्षक 22 असे एकुण 88 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
राधानगरी : मतमोजणी ठिकाण : तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 425 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 31 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 15 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 18, सहायक 36, सुक्ष्म निरिक्षक 18 असे एकुण 72 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
कागल : मतमोजणी ठिकाण : – जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 358 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 26 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 16 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 20, सहायक 40, सुक्ष्म निरिक्षक 20 असे एकुण 80 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
मतमोजणी ठिकाण : व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, कोल्हापूर
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 16 टेबल, 354 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 23 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 20, सहायक 21, सुक्ष्म निरिक्षक 22 असे एकुण 63 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 12 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 15, सहायक 30, सुक्ष्म निरिक्षक 15 असे एकुण 60 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
करवीर : मतमोजणी ठिकाण : – शासकीय धान्य गोदाम क्र. D, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 358 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 26 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 14 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 34, सुक्ष्म निरिक्षक 17 असे एकुण 68 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
कोल्हापूर उत्तर : मतमोजणी ठिकाण : – शासकीय धान्य गोदाम क्र. A, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 315 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 23 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 10 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 12, सहायक 24, सुक्ष्म निरिक्षक 12 असे एकुण 48 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
शाहूवाडी : मतमोजणी ठिकाण : – जुने शासकीय धान्य गोदाम-पश्चिमेकडील बाजू भाग-ब, तहसिल कार्यालया, शाहूवाडी
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 343 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 25 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 14 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 34, सुक्ष्म निरिक्षक 17 असे एकुण 68 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
हातकणंगले : मतमोजणी ठिकाण : शासकीय धान्य गोदाम- नंबर 2, हातकणंगले.
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 16 टेबल, 334 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 21 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 20, सहायक 21, सुक्ष्म निरिक्षक 22 असे एकुण 63 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 10 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 12, सहायक 24, सुक्ष्म निरिक्षक 12 असे एकुण 28 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत. इचलकरंजी
इचलकरंजी : मतमोजणी ठिकाण : – राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केटसमोर, इचलकरंजी
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 268 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 20 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 7 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 9, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 9 असे एकुण 36 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
शिरोळ : मतमोजणी ठिकाण : – मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आवारामध्ये (तळ मजला)
ईव्हीएम वरील मतमोजणी – एकुण 14 टेबल, 307 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमसाठी 22 फेऱ्या, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 17, सहायक 18, सुक्ष्म निरिक्षक 19 असे एकुण 54 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.
पोस्टल मतमोजणी – 10 टेबल, त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक 12, सहायक 24, सुक्ष्म निरिक्षक 12 असे एकुण 48 अधिकारी कर्मचारी काम पाहणार आहेत.