कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 9.00 वाजेपर्यंत 7.38 टक्के मतदान

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 9.00 वाजेपर्यंत 7.38 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघात 8.78 टक्के झाले. 

 

जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे*

271- चंदगड – 6.78 टक्के

272- राधानगरी – 6.67 टक्के

273- कागल – 8.78 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण – 7.25 टक्के

275- करवीर – 7.76 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 8.25 टक्के

277- शाहूवाडी – 7.23 टक्के

278- हातकणगंले – 6.20 टक्के

279- इचलकरंजी – 7.47 टक्के

280- शिरोळ – 7.53 टक्के