दलित महासंघाच्या वतीने महायुती उमेदवारास जाहीर पाठिंबा.

कोल्हापूर : दलित महासंघ ही प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आणि फुले, शाहू ,आंबेडकर,अण्णा भाऊ यांच्या विचाराने जाणारी संघटना आहे. गेल्या 33 वर्षापासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत असून मातंग समाज आणि इतर दलित – भटका – विमुक्त समाज हा या संघटनेचा जनाधार आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ज्या पद्धतीने मातंग समाज आणि एकूणच दलित समाजाच्या अनुषंगाने कार्य केले आहे ते इतके महत्त्वपूर्ण आणि लक्षणीय आहे की,ज्यामुळे आम्ही दलित महासंघाचा महायुती आणि महायुती घटक पक्षातील सर्व उमेदवारांना आमचा पाठिंबा जाहीर करत असल्याचे सांगितले.

 

 

 

 

दलित महासंघ महायुतीला पाठिंबा देत आहे त्याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे –
१. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून जाहीर करण्यात आला.
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून तेथे “शिक्षाभूमी” स्मारक उभारण्यात आले.
3. मास्को, रशिया येथे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते उभा करण्यात आला.
4. अण्णा भाऊ साठे यांचे चिराग नगर ( मुंबई ) येथे 305 कोटी रुपयांचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
5. वाटेगाव येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले.
6. पुणे येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे 120 कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि कामास प्रारंभ.
7. अण्णा भाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुम्बई (आर्टी) ची स्थापना.
8. अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणास गती देण्याच्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश मा. बदर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना केली.
9. संविधानातील 370 कलम रद्द केल्यामुळे खऱ्या अर्थाने जम्मू कश्मीर मध्ये प्रथमच भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली.
एकूणच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार यांनी मातंग समाजाबरोबरच दलितांचे अनेक वर्षांचे अस्मितेचे प्रश्न सोडवल्यामुळे दलित महासंघाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये दलित महासंघाचे कार्यकर्ते सहभागी होतील आणि आपल्या विजया मध्ये आपला वाटा उचलतील अशी मला खात्री आहे. या बैठकीसाठी या बैठकीसाठी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.बाबासाहेब दबडे दलित महासंघाचे उपाध्यक्ष धनाजी सकटे महावीर सर्वगोडे,भाऊसो आवळे,तानाजी भोसले,अभी अवघडे,राजु बिराजे, गणेश दबडे,अमोल साळी,अमीत साळवी,सुमन आवळे, राजाबाई आवळे क्रांतीसाठे,सुरज तराटे, अविनाश तराटे,अमर महापूरे,आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते