एकाही घराला धक्का न लावता अकिवाट येथे औद्योगिक वसाहत उभी राहणार : उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

जयसिंगपूर :शिरोळ तालुक्यातील बेरोजगारी हटवण्यासाठी,उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची गरज ओळखून अकिवाट या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी करताना येथील रहिवाशांच्या एकाही घराला धक्का न लावता या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण होईल,भविष्यात या नागरिकांच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर शासन म्हणून आम्ही त्यांची दखल घेऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू,अशी ग्वाही, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जयसिंगपूर येथील इंद्रध्वज सभागृहात जयसिंगपूर शहर आणि परिसरातील उद्योजक व विविध व्यापारी संघटनांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता,यावेळी ते बोलत होते.प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राजकुमार बलदवा यांनी केले.

 

 

 

जयसिंगपूर शहर आणि परिसरातील उद्योजक व विविध व्यापारी संघटनांचा संवाद मेळावा येथील इंद्रधन सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाला,यावेळी उद्योगमंत्री सामंत बोलत होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राजकुमार बलदवा यांनी केले.यावेळी बोलताना नामदार सामंत पुढे म्हणाले,महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांपासून व्यापारी उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी काम करत आहे, राज्यातील उद्योजकांवर, व्यापाऱ्यांच्यावर,शेतकऱ्यांच्यावर, डॉक्टर,वकील यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही हे आमचं ब्रीदवाक्य आहे.

ज्या महाराष्ट्राला आर्थिक ताकद देण्याचे काम ज्या व्यापाऱ्यांनी केलं त्या व्यापाऱ्यांना ठाकरे गटाच्या एका नेत्याकडून भेसळखोर म्हटले जाते त्याचा बदला आपण सर्वांनी घेतला पाहिजे.शैक्षणिक, सहकार,उद्योग शेतीला प्राधान्य महायुती सरकारने दिले आहे.राज्यातील उद्योग उभारणीसाठी प्रत्येक तालुक्याला औद्योगिक वसाहत मंजूर केली त्यातील एक शिरोळ तालुका आहे. सध्या राज्यात ५२ टक्के परकीय गुंतवणूक असताना महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात ४० टक्के परकीय गुंतवणूक आणण्याचा उल्लेख असल्याने महाविकास आघाडीचे अंकगणित चुकले आहे,त्यांना उर्वरित 12 टक्के परकीय गुंतवणूक कर्नाटक राज्यात न्यायचे असेल,असाही टोला त्यांनी लगावला.मंत्री पदाचा राजीनामा देऊन आमदारकी पणाला लावून यड्रावकर यांनी एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले आहे. आमदार यड्रावकर त्यांचा पायगुण चांगला असल्यामुळेच मी या ठिकाणी उद्योगमंत्री म्हणून उभा आहे.मी उद्योगमंत्री आहे म्हणजे आमदार यड्रावकर हे उद्योगमंत्री असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना ५० हजाराच्या मताधिक्याने त्यांना निवडून द्या नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार यड्रावकर यांच्यावर कृपादृष्टी करतील,असेही ते म्हणाले.आमदार यड्रावकर यांची नाळ मतदार संघातील प्रत्येक मतदाराबरोबर जोडली गेली आहे असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात निधी ते खेचून आणले आहेत आणि तालुक्याचा विकास साधला आहे. राज्यातील २८८ आमदारांपैकी एकमेव आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे उपद्रव न देणारे आमदार आहेत.अशा आमदाराला पुन्हा विकास कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे,असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले,आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढे सक्षम आहेत की,त्यांच्याकडे कोणतेही काम नेले तर अगदी दोन मिनिटाच्या अवधीत पूर्ण होते.त्यामुळेच २ हजार कोटींच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा चौफेर विकास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी साधला आहे.तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज रुग्णालये, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहत,देशातील सुसज्ज असे पहिले होत असलेले मनोरुग्णालय यासह अनेक कामे आमदार यड्रावकर यांनी केलेले आहेत.तालुक्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी माहिती सरकारने त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना नक्कीच नक्कीच त्यांच्या समस्या मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही,संजय पाटील यड्रावकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वतीने दिली.यावेळी उद्योजक दादासो पाटील चिंचवाडकर,असोसिएशनचे सेक्रेटरी सुरेश बिराजे,स्टोन क्रशर असोसिएशनचे अबुबकर डांगे,भाऊसो नाईक,जितेंद्र पाटील,तुषार सुलतानपुरे,विद्याधर कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून उद्योजकांच्या समस्या मांडून राज्य शासनाच्या वतीने सोडवण्याची मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव मंगेश चिवटे,शिवसेना शिंदे गटाचे नेते मुरलीधर जाधव,रवींद्र माने, माधुरी टाकारे,शिवाजी जाधव,भाजपाचे नेते रामचंद्र डांगे,मुकुंद गावडे,सतिश मलमे,शिवसेनेच्या स्मिता कदम,दशरथ काळे,राकेश खोंद्रे,आसमा पटेल,पराग पाटील,उदय जटाळ, चंद्रकांत मोरे,भोला कागले,दानवाडचे सरपंच डी.सी.पाटील,विश्वास बालीघाटे,प्रकाश झेले,राजेंद्र नांद्रेकर, ॲड. संभाजी राजे नाईक,जयसिंगपूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय आवटी व सर्व पदाधिकारी,जयसिंगपूर आर्किटेक इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजित मरसुदे व त्यांचे पदाधिकारी,क्रीडाईचे अध्यक्ष राहुल कुंभार,जयसिंगपूर किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज डिगे, जयसिंगपूर कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक गणबावले,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बंडू लडगे,क्रशर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कलकुटगी,सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील, टिंबर असोसिएशनचे अध्यक्ष धीरज पटेल यांच्यासह सर्व असोसिएशनचे पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार निर्मल पौरवाल यांनी मानले.

🤙 9921334545