कोल्हापूर: लिंगनूर (ता. कागल) येथील येथील समरजीत घाटगे गटाला कंटाळून मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये घनश्याम कांबळे, अमोल कांबळे, परशुराम कांबळे, करण कांबळे, शहाजी कांबळे, सचिन कांबळे व तानाजी कांबळे यांनी हसन मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देत मुश्रीफ गटात प्रवेश केला.

मुश्रीफ म्हणाले, ज्या विश्वासाच्या भावनेने मुश्रीफ गटात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तड़ा आम्ही जाऊ देणार नाही. या युवकांचे, कुटूंबीय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन.
यावेळी मुश्रीफ गट, बाबा गट व मंडलिक यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
