टाकवडे : इचलकरंजी शहराला लागूनच टाकवडे गावचा विस्तार आहे.त्या दृष्टीने आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी टाकवडे गावाला भरघोस निधी दिला आहे. या निधीतून गांवचा मोठा विकास झाला आहे.त्यामुळे गावातून त्यांना मोठे मताधिक्य देवून विजयाचा गुलाल टाकवडेतून उधळणार असल्याचा विश्वास प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी व्यक्त केला.

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जनसंवाद यात्रा टाकवडे येथे संपन्न झाली.गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत महिलांनी आमदार यड्रावकर यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी येथील करवीर चौकामध्ये झालेल्या सभेत टाकवडेकर बोलत होते.
यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोददादा पाटील यांनी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात केलेल्या विकास कामाचा आढावा मांडला.
यावेळी राजू कागले,उदय झुटाळ, सुनील पाटील मेजर,धनाजी यंत्रे, मनोहर निर्मळे,अविनाश पाटील,रोहित पाटील,गणेश कांबळे,सुरेश कांबळे,राजू कांबळे,शकील शेख,दाऊद मुल्ला, जमाल फकीर,अबूबकर बारगीर,सुरेश वडर,दत्ता कुलकर्णी,फक्रुद्दीन मुल्ला यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
