राजापूर मध्ये आमदार यड्रावकर यांचा दौरा

राजापूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदार संवाद यात्रेला राजापूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली.या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला.येथील अमोघसिद्ध देवालय या ठिकाणी सभा संपन्न झाली.

 

 

प्रारंभी विठ्ठल पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा सर्वांच्या मनातील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत. विकास कामे करण्यासाठी अगदी तळागाळातला सर्वसामान्य माणूस जरी त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेला तर तो कोणत्या पक्षाचा आहे,कोणत्या जातीचा आहे,हे न पाहता तात्काळ त्याचे काम मार्गी लावून गावचा विकास कसा साधला जाईल,याकडे त्यांनी लक्ष दिल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी अल्ताफ जमादार यांनी गावातून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.

यावेळी माधुरी टाकारे,अरुण मगदूम, सागर अंकलखोपे,गुरु कुंभार,बुधगोंडा पाटील,मुकूंद गावडे,बाळासाहेब नाईक,सुभाष कट्टी,सुभाष गस्ते,पी.के. पाटील,शिवगोंड पाटील,अल्ताफ मोकाशी,इमाम पटेल,असुदूल्ला खोंदू सुप्रिया नरुटे,अश्विनी भेंडे,आरती गायकवाड,सुनिता ढाले,मंगल निर्मळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545