राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ कबनूर येथे भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा

कोल्हापूर: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे , ताराराणी पक्ष युवा अध्यक्ष सतीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा दत्त मंदिर शिक्षक कॉलनी, कबनूर येथे संपन्न झाला.

 

 

या संवाद मेळाव्यात राहुल आवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासासाठी नवा अध्याय उलगडण्याचा निर्धार व्यक्त केला. पारदर्शक आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाचे ग्वाही देण्यात आली , ज्यातून जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील.

यावेळी रांगोळीच्या सरपंच संगीता नरंदे, नगरसेविका शकुंतला मुळीक, नगरसेवक मनोज हिंगमिरे, नगरसेविका सुजाता कोरे, जेवरबानु दुंडगे, राजाराम पोवार, दत्ता मांजरे, रियाज जमादार यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होते.

🤙 9921334545