कोल्हापूर : शिरटी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार यड्रावकर यांनी १२ कोटींचा निधी दिला आहे.या निधीच्या माध्यमातून शिरटी गावचा कायापालट झाला आहे.शेतकऱ्यांसाठी क्षारपडचा पायलट प्रोजेक्ट,सर्व समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सांस्कृतिक हॉल विविध विकासकामे, औद्योगिक वसाहत,जनतेच्या आरोग्यासाठी विविध योजना यामुळे असा आमदार आपल्या तालुक्याला मिळाला,हे आपले भाग्य आहे.त्यामुळे सर्वांनी मिळून अशा नेत्याला विधानसभेत पाठवून शिरोळ तालुक्याचा विकास साधूया,असे आवाहन शिरटीचे जेष्ठ नेते यशवंत कोगनोळे यांनी केले.

शिरटी येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.प्रारंभी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अमोल सुतार,हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव यांनी आपल्या मनोगतातून आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास कार्याचा आढावा घेतला.
यावेळी भाजपाचे शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे,कल्लाप्पा खवाटे, जयपाल शिरगावे,सूर्यकांत उदगावे, बापूराव पाटील,एन.जे.पाटील,रावसो खवाटे,धनपाल टारे,भास्कर चौगुले, जीवनधर चौगुले,अण्णासो शिरगावे, विजय कांबळे,अनिल ढेकळे,रामगोंडा पाटील,अण्णा सुतार,अण्णा चव्हाण, धनाजी भोसले,रमेश कुंभार,सागर मगदूम,सागर कोगनोळे,जम्मू उदगावे, बाबासो चौगुले,रामचंद्र कोगनोळे,राहुल टारे,विश्वास कांबळे,शांतिनाथ चौगुले, कुलभूषण चौगुले,श्रीकांत चौगुले, मुबारक शेख,विपुल कोगनोळे,वृषभ पाटील,सुमित पाटील,गोपाल पाटील, सुनील पाटील,शेलारी बंडगर,बादशहा मुल्लाणी,शंकर रोजे,शामराव बंडगर, भूपाल रोजे,शामराव बंडगर गोपाल रोजे,संदीप भोसले,राजकुमार ढेकळे, सुदर्शन दुबे,पांडुरंग भंडारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.
