कोल्हापूर: महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे आणि तामगाव परिसरात आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संवाद यात्रा काढण्यात आली.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारावेळी वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे आणि तामगाव येथील नागरिकांशी आमदार सतेज पाटील यांनी संवाद साधला. नागरीकांचा प्रतिसाद पाहून ऋतुराज पाटील यांचा विजयाची खात्री झाली. असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, आजी- माजी सदस्य, विविध सेवा संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.