काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी खा. चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीपदी ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीच सदस्य, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती केली आहे. ४५ सदस्यांच्या या समितीच्या समन्वयकपदी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

 

प्रचार समितीच्या सदस्यांमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, खा. डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री सुनिल केदार, सतिश चतुर्वेदी, सुरेश शेट्टी, माजी खासदार हुसेन दलवाई, कुमार केतकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, एससी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, आ. भाई जगताप, आ. अभिजीत वंजारी, आ. प्रज्ञा सातव, चारुलता टोकस, उल्हास पवार, मोहन जोशी, अनिस अहमद, अशोक पाटील, चरणसिंह सप्रा, राजाराम पानगव्हाणे, रामहरी रुपनवर, मुनाफ हकीम, एम. एम. शेख, राजेश शर्मा, सचिन सावंत, शरद अहेर, महेंद्र घरत, किशोर बोरकर, जेनेट डिसुझा, इब्राहिम भाईजान, कमल फारुकी, अनिषा बागुल, सुर्यकांत पाटील, डॉ. हेमलता पाटील, मोहन देशमुख, प्रविण देशमुख, सुनिल अहिरे, अनिस कुरेशी, अशोक धवड या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रचार समितीची पहिली बैठक महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरूवार दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता टिळक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे