लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी दीक्षा भूमीला अभिवादन करणार : आमदार अभिजित वंजारी

नागपूर:-संविधान वाचविण्यासाठी सुरु असलेला लढा बुलंद करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागपूरात आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दीक्षा भूमीला अभिवादन करणार असल्याची माहिती आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली.

 

 

वंजारी म्हणाले की, उद्या नागपूर येथे राष्ट्रीय नेते राहुल गांधी येत आहेत. संविधान संमेलनाला संबोधित करण्याबरोबर ते दीक्षा भूमीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्यांचा मुंबई दौरा असून मुंबईत त्यांची सभा होणार आहे.

संविधान संमेलनाचे आयोजक अनिल जयहिंद म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा डाव आहे. लोकसभेला चारशे जागा मिळाल्यावर संविधान बदलण्याची भाषा करण्यात आली. संविधानाने आपले रक्षण केले आहे, देशातील प्रत्येक माणसाला संविधानामुळे हक्क मिळाले. उद्या नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला दोनशेहून अधिक संघटनांचा पाठिंबा आहे. या सगळ्या संघटना न्यायासाठी लढणार आहेत. संविधानाने दलित, ओबीसी ,आदिवासी, महिलांसाठी काय केले याबाबत उद्या चर्चा होणार आहे.

नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संविधान संमेलन सुरु होणार आहे. या संमेलनात संविधान, संविधानाने समाजातील विविध घटकांना दिलेले हक्क, महिलांचे अधिकार, शिवशाही आणि संविधान अशा विविध विषयांवर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे.