कोल्हापूर: भोगावती सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक, केदारलिंग वि.का.स. संस्थेचे संचालक, तसेच विविध सहकारी संस्थांचे संस्थापक/चेअरमन मा.सुनील आनंदराव कारंडे (आप्पा) यांच्यासह परिते येथील विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, त्यांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील , सरदार शामराव पवते , आर. के.पाटील, अजित धोत्रे , मधुकर कांबळे , करवीर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अरविंद कारंडे , रामचंद्र पोकर्णेकर, अरुण तात्या पाटील, सुभाष पोवार , तानाजी जाधव, जनार्दन पाटील, रंगराव चौगले, साताप्पा पाटील, भोगावती व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सर्जेराव महिपती पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.