किणी – महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी राजूबाबा आवळे आमदार होणे गरजेचे आहे.यासाठी मातोश्री च्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक आवळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पेठवडगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्यात केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ऊबाठा)कार्यकर्त्यांचा मेळावा वडगाव येथे पार पडला.यावेळी आ.राजूबाबा आवळे, जिल्हाउपप्रमुख साताप्पा भवान यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रास्तविक वडगाव शहर अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले.यावेळी विविध कार्यकर्त्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी बोलताना तालुका उपप्रमुख राजेंद्र पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.यामुळे
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करण्यासाठी हातकणंगलेतुन आपला आमदार हवा.यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून राजू आवळे यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक एकजूटीने प्रचार करतील असे सांगितले. सुनील माने यांनी याअगोदर शिवसैनिकांची गळचेपी झाली त्यांना न्याय मिळाला नाही.याकरिता तळागाळातील सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन काम करावे शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहतील असे सांगितले. जिल्हा उपप्रमुख साताप्पा भवान म्हणाले शिवसेना संपविण्याचे काम करणाऱ्या भाजप आणि गद्दार सेनेसारख्या नरकासुराला गाडण्यासाठी आपण एकजूट होऊन काम करायचे आहे.उद्धव ठाकरे यांना सन्मानाने पुन्हा मुख्यमंत्रीपदी बघायचे आहे यासाठी मातोश्रीचा आदेश शिवसैनिक मानतील आणि राजूबाबांना पुन्हा आमदार करण्यासाठी जीवाचे रान करतील असे सांगितले. आ.राजूबाबा आवळे यांनी यावेळी बोलतानाभविष्यात महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी कार्यरत राहणार
महाविकास आघाडी म्हणून ताकतीने आणि एकजुटीने लढाई करण्याची आहे
महाविकास आघाडी सत्तेत येताना पहिला पाठिंबा राजूबाबा आवळे या आमदाराचा असेल याची ग्वाही देत मतदारसंघातील कामाबाबत शिवसैनिकांना आपले दार सदैव उघडे अशी ग्वाही दिली.जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी शेवटी बोलताना२०१९ नंतर वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन झाली
ही लढाई महाराष्ट्राचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे, अस्तित्वाची लढाई आहे. यापुढे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचे काम यापुढे निश्चितपणाने होणार असल्याचे सांगतानाच आपणा सर्व शिवसैनिकांसाठी मातोश्रीवरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांचा येणारा आदेश अंतिम मानून आपण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.यावेळी बंडा हवालदार ,संदीप दबडे,रमेश शिंदे,विश्वास कोळी,विष्णू पाटील, शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास मोहन कोळेकर,अंकुश माने,अनिल माने,उमेश शिंदे, नारायण कुंभार,अमित घोटवडे, स्वप्नील मगदूम,अनिल दबडे,देवाषीश भोजे,योगेश चव्हाण,सुनील वडर ,राज कोळी यांचेसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन मच्छिन्द्र पाटील यांनी केले.संदीप दबडे यांनी आभार मानले.