अशोक मानेंना पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने दिला पाठिंबा

कोल्हापूर: हातगणंगले विधानसभेचे उमेदवार अशोक माने यांना पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेकडून पाठींबा देण्यात आला. विविध संघटनांचा मिळणारा पाठिंबा हा मी गेल्या पाच वर्षात हातकणंगले विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची पोचपावती आहे.या विविध संघटनांचा मिळणारा पाठिंबा ऊर्जा आणि काम कार्याची प्रेरणा देणारा आहे. पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा पाठींबा नक्कीच विजयापर्यंत पोहाचावेल अशी आशा आहे.असे ,मत माने यांनी व्यक्त केले.

 

 

यावेळी संतोष एस आठवले राष्ट्रीय अध्यक्ष पँथर आर्मी, अमोल कुरणे संस्थापक अध्यक्ष परिवर्तन फौंडेशन,हुसेनभाई मुजावर (भैय्यासाहेब ) पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दलित महासंघ,समिर विजापुरे जिल्हा संपर्कप्रमुख पॅंथर आर्मी,मुकेशराव घाटगे हातकणंगले तालुका अध्यक्ष पॅंथर आर्मी आदींच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545