मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी कोल्हापूर विधानसभेबाबत बैठक

कोल्हापूर (युवराज राऊत)

अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने वसंतराव मुळीक, यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शशिकांत पाटील, उदय देसाई, विजय पाटील, प्रताप नाईक, अवधूत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील आढावा घेत असताना निवडणुकीस उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या बाबत माहिती दिली.

 

 

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी २ नोव्हेंबर नंतर निर्णायक भूमिका घेतली जाईल.असे सांगितले.
अंतरवाली सराटी येथे हजारो गाड्यांची आजही वर्दळ होती मराठा समाजाबरोबर इतर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वातून वेळ काढून कोल्हापूर साठी वेळ दिला. बैठकी नंतर लगेच त्यांना लगेच सलाईन लावण्यासाठी नेण्यात आले.