कोल्हापूर : राधानगरी मतदार संघात दिवाळीत चांगलेच फटाके फुटू लागले आहेत.महाविकास आघाडी चांगलीच एकसंघ होऊ लागलेली आहे.माजी मंत्री सतेज पाटील यांनी लक्ष घातल्याने या मतदारसंघात आ.आबिटकरांना ‘लक्ष्य ‘ केले जात आहे.आ.आबिटकर यांनी गेल्या दहा वर्षांत प्रत्येक गावातील कॉंग्रेसचेच गट फोडल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आबिटकरांबद्दल प्रचंड रोष निर्माण होताना दिसत आहे.
आजऱ्याचे जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांनी आज महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.जयवंतराव शिंपी यांना मानणारा मोठा वर्ग आजरा तालुक्यात असून त्यांचे कार्यकर्ते त्यांचा शब्द प्रमाण मानत असतात.शिंपींच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडी व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे.ऐन दिवाळीत जयवंतराव शिंपी यांनी के.पी.पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे दिवाळीच्या खमंग फराळाबरोबर के.पीं.ची मशाल बळकट झाल्याची खुमासदार चर्चा रंगु लागली आहे