कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय पवार, अरूण दुधवडकर, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनिल मोदी, रविकिरण इंगवले, नियाज खान, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, राजेंद्र जाधव, मंजित माने आदी उपस्थित होते.