प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 45 हजार रुपये दंड वसूल

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तावडे हॉटेल लाईन, शाहू टोल नाका, राजारामपुरी परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली. यावेळी शाहू टोल नाका येथील विशाल ट्रेडर्स, जयवंत स्वीट्स, राजारामपूरी येथील शर्मा स्वीट्स, अय्यंगार बेकरी, पुरोहित बेकरी, जसवंत स्वीट्स व तावडे हॉटेल येथील श्याम सुखवानी शॉप अशा सात व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लॅस्टीकचा साठा आढळून आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने पाच व्यापा-यांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर तावडे हॉटेल येथील श्याम सुखवानी शॉप व शाहू टोल नाका येथील जसवंत स्वीटस यांना प्रत्येकी रु 10000 असे एकूण 45 हजार रुपये दंड करुन तो वसूल करण्यात आला. हि कारवाई सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक भूमी कदम, सुशांत कावडे, मुनीर फरास, मनोज लोट व कर्मचारी यांनी केली.

 

 

 

   तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व नमूद आस्थापना व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.