कोल्हापुरातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संच कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर : कोल्हापुरातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेतून गृहउपयोगी संच यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 

 

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरातील अनेक कुटुंबीयांना शासकीय योजनांची मदत मिळवून दिली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या इतर योजना विषयी कृष्णराज महाडिक यांनी नागरिकांना माहिती दिली.

यावेळी प्रताप देसाई जी, विश्वास पवार जी, सचिन पवार जी, किसन खोत जी, भरत बेले जी, सुरज तिबिले जी, प्रसाद पाटोळे जी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.