कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या नागरीकांसमवेत चिंचवडे लॉन, चिंचवड, पुणे येथे कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन डॉ. प्रकाश आबिटकर यांनी केले होते.
यावेळी आबिटकर म्हणाले,राधानगरी विधानसभा मतदार संघातील जनता हेच माझं कुटुंब मी मानतो. मतदारसंघ आणि नागरीकांच्या विकासासाठी अहोरात्र झटतो आहे. आपला मतदारसंघ राज्यातील प्रगत, सुंदर आणि देखणा मतदार संघ करीत आहे. याकामी मला साथ द्या असे आवाहन उपस्थितांना केले.
माझ्या विजयात तुमची साथ महत्वाची आहे. कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करतोय. तुमच्या गावातील, भागातील विकासकामे, प्रगती तुम्ही पुण्यात राहून बघताय याचा मला अभिमान आहे. आजची तुमची उपस्थिती हे माझ्यावर असलेले प्रचंड प्रेम दाखवते. माझे काम अधिक गतिमान करण्यासाठी साथ द्या.
आजपर्यंतचा तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या विजयासाठी महत्वाचा ठरला आहे. सर्व प्रश्न मार्गी लावून मतदार संघाला पुढे नेणार आहे. दहा वर्षात केलेली विकासकामे आणि जनतेचे पाठबळ या जोरावर मी पुन्हा लढत आहे. यामुळे विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप याकडे बघायला मला वेळ नाही. माझा निकाल उंचाविण्यात पुणेकरांचा वाटा मोठा असेल. प्रत्येक जण माझ्या विजयासाठी झटतोय यातच माझा विजय आहे. विकासाचे व्हिजन घेऊन कामांची पूर्तता करून मी लढतोय. पुण्यातील मतदार संघवासियांचे प्रश्न मार्गी लावू मतदारसंघांचे नियोजन आणि व्हिजन घेऊन जातोय. लोकांना अभिप्रेत असलेले काम करतोय. असे हि ते यावेळी म्हणाले.
यावेळी उद्योगपती पी. टी. चौगले, सखाराम रेडेकर, शामराव पत्ताडे, संजय गिरी, उद्योजक संजय वडर, सयाजी भांदीगरे, अरुण गृहदगे, साहेबराव नलगे, पांडुरंग पवार, शिवाजी पाटील, कोंडीबा पवार, तुकाराम खोत, बाळू फराकटे, अतुल पाटील, बाबू तोंडकर, शरद पाटील, आनंदा पाटील, बाजीराव देसाई (मेजर), पांडुरंग पाटील, अशोक देसाई, अनिल वारके, अनिल पाटील, विक्रम पाटील, रणजीत मगदुम, सौरभ पाटील म्हसवेकर, अंकूश जठार, डॉ. अभय पाटील, सी.एस. पाटील सर, अर्चना देसाई, तेजस्विनी कांबळे यांच्यासह प्रमुख मान्यवर राधानगरी विधानसभा मतदार संघातील पुणे वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते..