महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण देत, त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या येण्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

 

खासदार नारायण राणे यांनी निलेश यांच्या शिवसेना प्रवेशासाठी होकार दिल्याबद्दल आभार मानले, तसेच त्यांनी जिथून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्या शिवसेनेत निलेशचा प्रवेश झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात महायुती अधिक भक्कम झाली असून ज्या कुडाळ शहराने राणे साहेबांना २६ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले ते आता ५२ हजार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यासमयी व्यक्त केला.