वडगावंसह हणबरवाडी येथे हसन मुश्रीफ यांच्या संपर्क बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद

वडगांव : वडगाव ता. कागल तसेच हणबरवाडी येथे हसन मुश्रीफ यांच्या संपर्क बैठकी झाल्या. मिळालेल्या सत्तेचा वापर गोरगरिब व वंचित, शोषितांसाठी केल्या, त्यासाठी प्रसंगी प्रचलित कार्यातही बदल केला. परिणामी शासनाच्या सर्व योजना गावांबरोबर वाड्या -वस्त्यांवर पोहचविल्या.

 

 

शशिकांत खोत म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ यांनी डोंगर कपारीत वसलेल्या चिकोत्रा खोऱ्यातील वाड्या-वस्त्यांवरील दारोदारी विकासाची गंगा पोहोचवली.

वडगाव येथे सरपंच श्रीमती स्नेहलता मोरे, लगमाना कांबळे, रवींद्र देवठाणेकर, सोनूसिंग घाटगे, डी. बी. कांबळे, तानाजी पाटील, आनंद आडनाव, रतन कांबळे तसेच हणबरवाडी येथील बैठकीत प्रताप खोत, विलास खोत, मारुती पोवार, सदाशिव पोवार, विशाल डाफळे, प्रांजली ढोपे, आनंदा मोहिते, सदाशिव चौगुले आदी उपस्थित होते.

कापशी खोऱ्यातील सर्वच संपर्क बैठकांना माता-भगिनींची प्रचंड मोठी उपस्थिती होती. माझ्या संरक्षणासाठी माझ्या लाडक्या बहिणी नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.असे मुश्रीफ म्हणाले.

वडगाव येथील कार्यकर्ते प्रकाश शिंदे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा एका काव्यरूपाने घेतला आणि शेवटी ते म्हणतात, एकदा आमच्या या नेत्याची भेट घेऊन बघा मग त्यांचं कार्य कर्तुत्व जवळून बघता येईल.