कामाचा लेखा-जोखा मांडत सातव्यांदा तुमच्या समोर आलोय, आशीर्वाद द्या : हसन मुश्रीफ

गलगले: अर्जुनी, गलगले, मेतके, करड्याळ, मुगळी येथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ बैठकी पार पडल्या. पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील कुरुकलीकर, मयूर आवळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

मुश्रीफ म्हणाले कि, गेल्या ३०-३५ वर्षात सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अखंडपणे कार्यरत आहे. आपण केलेल्या कामाचा लेखा-जोखा घेऊन मी आपल्यासमोर सातव्यांदा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. मला प्रचंड मतांनी विजयी करा. ‘राज्याच्या ग्रामविकास खात्याची जेव्हा माझ्याकडे जबाबदारी आली तेव्हा मतदार संघातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी प्रचंड निधी तर दिलाच, याचबरोबर कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे. यातूनच कागल तालुक्याच्या सर्व बाजूने विकास करण्यात मला यश मिळाले आहे. आपण मतदार संघातील ७५० हून ग्रामदैवंतांचा जीर्णोद्धार केला आहे. याचे आपल्याला आत्मिक समाधान मिळत आहे.असे ही ते म्हणाले

शशिकांत खोत म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे हिमालयासारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे. परंतु त्यांच्यामध्ये कधीही गर्व नाही प्रत्येकाशी विनयशील वागणारे हे कागल तालुक्याचे श्रावण बाळ आहे या नेतृत्वाला जपणे आणि वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. मुगळी येथे सरपंच सौ. मेघा पाटील, कु. सानिका पाटील, सौ. अमृता पाटील, सौ. निशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

अर्जुनी येथे माजी सरपंच युवराज देसाई, सुनील देसाई, तुकाराम देसाई, रणजीत देसाई, राजेंद्र देसाई बाजीराव चौगुले आदी उपस्थित होते. गलगले येथे तालुका संघाचे संचालक डी. पी. पाटील, काका पाटील, के. वाय. पाटील, विलास पाटील, उपसरपंच दत्तात्रय पाटील, सतीश घोरपडे, मारुती मगदूम, आप्पासो पडळकर तर करड्याळ येथे एड. अरुण पाटील, संजय पाटील, दाजीबा कुंभार, तुकाराम अडसूळ, संजय गेंगे, शिवाजी गेंगे आदी उपस्थित होते. मुगळी येथे सदा साखरचे माजी संचालक रामभाऊ सांगले, माजी सरपंच पांडुरंग पसारे, मुकुंद पाटील, बाबासाहेब सांगले, सरपंच सौ. मेघा पाटील, उपसरपंच उदयबाबा पसारे आदी उपस्थित होते.