गारगोटी प्रतिनिधी,
आमदार प्रकाश आबिटकर यांनी पिंपळगांव जिल्हा परिषद मतदार संघातील वाड्या-वस्त्यावर जन आशिर्वाद यात्रेअंतर्गत भेट देऊन नागरीकांशी हितगुज केले. आमदार आबिटकर यांनी वाड्या-वस्यां पवरील मार्गस्थ लावलेले प्रश्न, निराधार व परितक्त्या महिलांबरोबरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंचा लाभ मिळवून दिलेबद्दल आमदार आबिटकर यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक ही माता-बहिणींची आहे. राज्यातील सत्तेत कुणाला आणायचे हे त्या ठरवणार आहेत. माय-माऊलींना गावोगावी जाऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले जाईल. आपला भाऊ, मुलगा समजून आशीर्वाद द्या. लाडक्या बहिणींसह विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना कायमस्वरुपी सुरू ठेवल्या जातील असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
यावेळी भारती भोईटे म्हणाल्या, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1 हजार 500 रुपये प्रति महिना देऊन महिलांचा मोठा सन्मान केला आहे. विधवा, परितक्त्या, वयोवृध्द महिलांनाही लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आमदार आबिटकर यांच्या विजयात मोठा हातभार लावतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव, पंचायत समिती माजी सभापती सुनिल निंबाळकर, सदस्य जयवंत चोरगे, माजी सरपंच श्रीधर भोईटे, बाळासाहेब इंदुलकर, रघुनाथ गोरे, रमेश थोरबोले, के.ए.देसाई सर, संतोष शिंदे, निलेश देसाई, साताप्पा कल्याणकार, युवराज फगरे, जायसिंग सुतार, संभाजी राणे, विकास शिंदे, अजित राणे, रमेश शिंदे, मधुकर देवलकर, महादेव शिवगण, सचिन कांबळे, बाळासाहेब वरणे, शांताराम नलगे, शामराव बावकर, रामभाऊ शिऊडकर, भीमराव रेडेकर, किरण भोईटे, आनंदा शेवाळेसर, भास्कर पाटील, राजाराम भराडे, सर्जेराव पाटील, नामदेव गडकरी, तानाजी घोटणे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आमदार आबिटकर यांनी पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील शिंदेवाडी, फणसवाडी, पुष्पनगर, सोनारवाडी, कालेकरवाडी, माडेकरवाडी, मडूर, फगरेवाडी, गडबिद्री, भांडेबांबर, दिंडेवाडी, नागणवाडी, बेडीव, राणेवाडी यासह विविध वाड्या-वस्त्यांवर भेट देऊन नागरीकांशी हितगुज केले.