कोल्हापूर : शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी वेळावेळी दिले होते. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासकांनी दिल्या होत्या.
यासाठी देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्ते अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त 1 व 2 तसेच सहा.आयुक्त क्र.2 व 3 यांनी समक्ष आपापल्या विभागीय कार्यालय क्षेत्रात उप-शहर अभियंता यांचे समवेत फिरती करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु शहरातील रस्त्याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. काही नागरीक सोशल मिडियावरफनही तक्रारी देत आहेत.
त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता वेळोवेळी सूचना देऊनही आजअखेर रस्तेबाबत कोणताही अहवाल आयुक्त कार्यालयात प्राप्त न झालेने आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक यांना कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.