कोल्हापूर: भारतीय निवडणूक आयोग अपंग लोकांसाठी (पीडब्ल्यूडी) अनुकूल अशा सेवा देऊन मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून सक्षम ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपने मतदाना दिवशी व्हीलचेअरसाठी विनंती करण्याची PWDs सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. दिव्यांग मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे एक मौल्यवान साधन आहे. हे ॲप वापरण्यास सोपे असून दिव्यांग व्यक्तींनी या ॲपचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा जिल्हा दिव्यांग अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी, त्यांचे मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत करण्यासाठी सक्षम ॲपमध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली असून ही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत–
आवाज सहाय्यः हे ॲप दृष्टिहीन असलेल्या दिव्यांगांसाठी आवाज सहाय्य प्रदान करते.
टेक्स्ट-टू-स्पीचः हे ॲप श्रवणदोष असलेल्या PWD साठी टेक्स्ट-टू-स्पीच प्रदान करते.
अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्येः मोठे फॉण्ट आणि हाय-कॉन्ट्रास्ट रंग यासारखी दिव्यांग मतदारांना वापरण्यासाठी सुलभ असणारी वैशिष्ट्ये अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये
ॲपमध्ये आहेत.
मतदान केंद्रांविषयी माहितीः मतदान केंद्रांबद्दल हे ॲप माहिती प्रदान करते, ज्यामध्ये मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्रावर उपलब्ध प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशीलांचा समावेश आहे.
तक्रारी: दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबद्दल तक्रारी नोंदवण्यासाठीहे ॲप सहाय्य करते.