कुंभोज (विनोद शिंगे)
इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडीच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. चोरटे घर फोडून घरातील दागिने रोख रक्कम लंपास करत होते. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते. ज्या ठिकाणी घरफोडी होत आहेत, त्या ठिकाणी गस्त वाढवावी, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासा याच अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून कबनूर दावत नगर येथील प्रेमचंद उर्फ टल्या राहुल कांबळे यांनी इचलकरंजी कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये घरफोडी केल्याची खबऱ्याद्वारे माहिती मिळाली.
पोलिसांनी प्रेमचंद कांबळे याला ताब्यात घेऊन अधिक तपास केले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इचलकरंजी शिवाजीनगर हद्दीतील एक घर शहापूर पोलीस स्टेशन हद्दीतील व सांगलीतील व शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील अशा चार घरफोड्या केल्याची कबुली दिली .
त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे व त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रेमचंद कांबळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर यातील त्याचा दुसरा आरोपी यश बागडे राहणार आसरा नगर इचलकरंजी हा सध्या फरार आहे त्याचाही शोध शिवाजीनगर पोलीस स्टेशन घेत आहे. या दोघांनी आणि कुठे घरफोड्या केल्या आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, फौजदार रावसाहेब कसेकर, अनिल चव्हाण, सुनील बाईत, विजय माळवदे, सुकुमार बरगाले, अरविंद माने, अविनाश भोसले, सतीश कुंभार, पवन गुरव व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ,कर्मचारी यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला गजाआड केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.