इस्पुर्ली येथील कार्यकर्त्यांने काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला

कोल्हापूर: दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इस्पुर्ली गावातील आनंदा कोरे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने आमदार ऋतुराज पाटील सतेज पाटील आणि काँग्रेसला रामराम ढोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

 

 

दबावाच्या आणि स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतलेचे आनंदा कोरे यांनी सांगितले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास केवळ कागदावर झाला असून, मतदारांची दिशाभूल करण्याची काम सुरू आहे. हा स्वार्थीपणा न पटल्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, असेही कोरे म्हणाले.

यावेळी कोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची अमल महाडिक यांनी स्वागत केले.