उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल आवाडे यांनी घेतले गणपतीचे दर्शन

कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा महायुतीकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीची आरती राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आली.

 

 

 

यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजप माजी नगरसेवक युवराज माळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.