कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश मधुकर माळगे हे अति सामान्य कुटुंबात जन्मलेले, पण सुसंस्कृत संस्कारांत वाढलेले एक कर्मठ व्यक्तिमत्त्व आहेत. लहानपणापासून सामाजिक न्याय आणि आंबेडकर चळवळ यांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर झाला. आंबेडकरी विचारधारा अंगीकार करत त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्याचे ठरवले. याच चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
सतीश माळगे यांच्या कठोर मेहनतीमुळे आणि निस्वार्थ कार्यामुळे त्यांची पक्षात नेतृत्वाची ओळख झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये ते जहाल तसेच प्रेमळ स्वभावामुळे लोकप्रिय आहेत. जातीय अन्याय, सामाजिक न्याय आणि शासकीय अन्यायाविरुद्ध नेहमी तत्पर राहून त्यांनी सर्वसामान्यांना साहाय्य दिले आहे.
आज सतीश माळगे आपल्या नवीन पावलांवर यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहेत. रामदास आठवले यांच्या अमूल्य सहकार्यामुळे आणि प्रेरणेमुळे त्यांनी आता उद्योगक्षेत्रात पाऊल टाकले आहे. सतीश माळगे हे आता एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या मार्गावर आहेत. आठवले यांचे सहकार्य आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे सतीश माळगे यांना या प्रवासात अत्यंत मोलाची मदत मिळाली आहे.
रामदास आठवले हे नेहमीच समाजातील मागासवर्गीयांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेत असतात. त्यांनी अनेक तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी आणि उद्योजकता क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी साहाय्य केले आहे. सतीश माळगे हे आठवले यांच्या या प्रेरणादायी ध्येयाचे एक ठळक उदाहरण आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रवासासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सतीश माळगे यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास हा निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या मेहनतीसाठी आणि आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे अजून एक यशस्वी मागासवर्गीय उद्योजक घडला आहे, ज्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे. रिपब्लीकन पक्षाच्या ॲाफीस मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेटून आठवले यांचे सतिश माळगे यांनी शुभा-शीर्वाद घेतले यावळे माळगे यांना शुभा-शीर्वाद देत रामदास आठवले यांनी कोल्हापुर जिल्हात रिपब्लीकन पक्षाचे काम आणि व्यवसाय जोमाने करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.