लज्जास्पद विक्रम… टीम इंडिया 46 धावांवर ऑल आऊट!

बंगळुरू : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदला गेला. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण भारतीय संघ 46 धावांवर तंबूत परतली. भारतानं अवघ्या 34 धावांत सात गडी गमावले होते, ज्यामध्ये पाच फलंदाज खातं न उघडता बाद झाले.

 

भारताने 34 धावांत सात गडी गमावले होते, ज्यामध्ये पाच फलंदाज खाते न उघडता बाद झाले होते. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर टीम इंडियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय संघाकडून सर्वोत्कृष्ट स्कोअरर ठरला तो ऋषभ पंत, ज्याने 20 धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वालने 13 धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

एकूणच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या 36 धावा आहे. 2020 मध्ये, भारतीय संघ ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांवर ऑलआऊट झाला असला तरीही टीम इंडियाने तो कसोटी सामना 2-1 ने जिंकला होता. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दुसरी सर्वात कमी धावसंख्या 42 धावा आहे, जी 1974 मध्ये बनवण्यात आली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत भारत 42 धावांत ऑलआऊट झाला. 1987 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ 75 धावांत ऑलआऊट झाला होता. याआधी भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमधील एका डावातील भारताची ही सर्वात कमी धावसंख्या होती. 2008 मध्ये अहमदाबाद कसोटीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांवर ऑलआऊट झाला होता. ही भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती.