नवी दिल्ली: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ हा येत्या १० नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतर देशाचे नवे सरन्यायाधीश कोण होणार, याबाबत चर्चा होत्या. या संदर्भात डी. वाय.चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहलं असून त्यांच्यानंतरचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड करण्याची विनंती त्यात करण्यात आली आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास न्यायमूर्ती खन्ना १० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती चंद्रचूड त्याच दिवशी निवृत्त होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. धनंजय चंद्रचूड हे दोन वर्ष त्यांच्या पदावर राहिल्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. केंद्राने याला हिरवा सिग्नल दिल्यास ते पदभार स्वीकारतील आणि न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ २३ मे २०२५ पर्यंत असेल. सुमारे साडेसहा महिने ते या पदावर राहणार आहेत. न्या. संजीव खन्ना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.